Home चित्रपट ‘मी आत्महत्या करतोय…’ मराठी अभिनेत्याच्या एकाच पोस्टने पोलीस हादरले; रात्रीच्या वेळी चक्रे...

‘मी आत्महत्या करतोय…’ मराठी अभिनेत्याच्या एकाच पोस्टने पोलीस हादरले; रात्रीच्या वेळी चक्रे फिरली अन्…

0
अभिनेता विकास समुद्रे

मुंबई,दि.१२: अनेक लोकप्रिय कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना हसवणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता विकास समुद्रे (Actor Vikas Samudre) याच्या एका सोशल मीडिया पोस्टने अचानक खळबळ उडवून दिली. विकासच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून “Im Committing Suicide” (मी आत्महत्या करतोय) अशी धक्कादायक पोस्ट पडली. मध्यरात्रीच्या सुमारास ही पोस्ट पाहाताच चाहत्यांचे ठोके चुकले, तर पोलीस प्रशासनातही एकाच घबराट पसरली.

घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अभिनेत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांचे पथक जेव्हा अभिनेत्यापर्यंत पोहोचले, तेव्हा समोर आलेली माहिती ऐकून सर्वांचेच डोके चक्रावून गेले.

विकास समुद्रे याने कोणताही असा टोकाचा प्रयत्न केला नव्हता. उलट, त्याच्याकडून ही पोस्ट केवळ एका ‘टायपिंग एरर’मुळे पडल्याचे निष्पन्न झाले. मुंबई पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता पूर्णपणे सुखरूप असून ही केवळ भाषेच्या गडबडीमुळे झालेली चूक होती.

आपल्या एका चुकीमुळे पोलीस आणि चाहत्यांची मोठी धावपळ झाल्याचे लक्षात येताच विकासने जुनी पोस्ट डिलीट केली आणि नवी स्पष्टीकरण देणारी पोस्ट शेअर केली.

नवी पोस्ट लिहीत विकासने स्पष्ट केले, “I m comiting suicide… अशी माझी पोस्ट केवळ टायपिंग एररमुळे झाली. मला ‘I m doing drama’ (मी नाटक करत आहे) असे लिहायचे होते. कोणीही काळजी करू नये, मी पूर्णपणे सुरक्षित आहे… तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद!”

विकास समुद्रे सुखरूप असल्याचे आणि केवळ शब्दांच्या घोळामुळे हा सगळा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आणि चाहत्यांनी शेवटी सुटकेचा निःश्वास सोडला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.