Girish Mahajan On Sharad Pawar: मंत्री गिरीश महाजन यांचा शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा

0

नाशिक,दि.११: Girish Mahajan On Sharad Pawar: मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. “उद्धव ठाकरे यांचं सरकार पडत होते. तेव्हा सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५२ आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं,” असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजपा नेते, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

गिरीश महाजन यांचा शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा | Girish Mahajan On Sharad Pawar

“२०१९ साली शरद पवार यांनी दिल्लीत भाजपाबरोबर ४ वेळा बैठका घेतल्या. पण, ऐनवेळी आम्हाला गाफील ठेवून घात केला,” असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले, “२०१४ ते २०१९ दरम्यान शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. ‘तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठिशी आहे’ असं शरद पवारांनी सांगितलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी दिल्लीत भाजपाबरोबर ४ वेळा बैठका घेतल्या.”

Girish Mahajan On Sharad Pawar

“बैठकांमध्ये सगळं ठरलं होतं. शरद पवार यांची आमच्याबरोबर चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी आम्हाला गाफील ठेवून शरद पवारांनी घात केला,” असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

दरम्यान, कोल्हापुरातील सभेत अजित पवार यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं. “लोकांची कामे करण्यासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही. उद्धव ठाकरे यांचं सरकार पडत होते. तेव्हा सत्तेत सहभागी होण्याबाबत ५२ आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं. हे जर खर नसेल, तर मी राजकारणात निवृत्त होईन. खर असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का?” असं अप्रत्यक्षपणे आव्हान अजित पवार यांनी शरद पवार यांना दिलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here