लाडकी बहीण योजनेसाठी शिबिराचे आयोजन

0

सोलापूर,दि.15: कै. शांताबाई मुद्देबिहाळ सार्वजनिक वाचनालय मंत्री चंडक नगर व जयराज नागणसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 जुलै मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मंत्री चंडक नगर भवानी पेठ येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात 178 महिलांची नोंदणी झाली आहे.

या शिबिराला जिल्हा सरकारी वकील रजपूत,माजी महापौर महेश कोठे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, रमेश व्हटकर,कॉंग्रेसचे सुशील बंदपट्टे,जी एम ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, भाजपाच्या वैशाली गुंड, श्रीशैल हत्तुरे, सुदीप चाकोते,माजी नगरसेवक प्रमोद काशिद, सचिन शिवशक्ति आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिर यशस्वी होण्यासाठी सिद्धेश्वर मुद्देबिहाळ, केदार बरबङे, जयराज नागणसुरे, भारती नागणसूरे, मल्लिनाथ मगरूमखाने यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here