सोलापूर,दि.29: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भागडे (Shivaji Bhagde) यांना राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाला आरक्षण मिळावे याकरिता अनेकांनी आत्महत्त्या केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी संपुर्ण महाराष्ट्रात मराठा समाज उपोषण करीत आहे. पोलीस कॅान्स्टेबलने राजीनामा दिला आहे. शिवाजी भागडे असे राजीनामा देणाऱ्या पोलीसाचे नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने अनेकजण टोकाचे पाऊल उचलत आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भागडे (Shivaji Bhagde) यांचा राजीनामा
पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भागडे यांनी 27 ॲाक्टेाबरला राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात मराठा समाज उपोषण करीत आहे, तरी सुध्दा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. मी सुध्दा मराठा समाजाचा आहे, माझे सुध्दा समाजाप्रती काही तरी देणे लागते म्हणून मी पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनाम देत आहे. शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. माननीय पोलीस अधिक्षक साहेब यांनी माझा राजीनामा मंजुर करावा हि नम्र विनंती. असे शिवाजी भागडे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीच्या मागणीमुळे राज्यातील समस्त कुणबी आणि मराठा यातील बहुसंख्य जनता त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विविध मार्गाने सक्रिय झाली आहे. जरांगे पाटील यांनी 40 दिवसांपूर्वी पहिल्या उपोषणाच्या दरम्यान राज्य शासनाला नमतं घ्यायला लावलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या सर्वांनीच आणि अवघ्या मंत्रिमंडळानं मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं.