Maharashtra Rain Alert: पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा

0

मुंबई,दि.30: Maharashtra Rain Alert: पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यांत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. राज्यातील बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये शेती पिकांसह घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला आहे.

हेही वाचा Ajit Pawar On Gautami Patil: गौतमी पाटीलचा बैलासमोर डान्स, अजित पवार म्हणाले…

पुढील पाच दिवस देखील अवकाळी पावसाचा इशारा | Maharashtra Rain Alert

हवामान खात्याने आता राज्यात पुढील पाच दिवस देखील अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपुरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

गारपिटीचा अंदाज | Rain Alert

मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

तुरळक पावसाची शक्यता

मुंबई आणि ठाण्यात देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबईतील काही भागांत आज, रविवारीदेखील हलका पाऊस देखील झाला.

दरम्यान, रविवारी रात्री, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली. जवळपास एक तास पाऊस बरसला. मुसळधार पावसानं चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात पाणी साचले होते. सांगोली तालुक्यातील वाढेगाव परिसरातील दिघे वस्ती, हजारे वस्ती इंगोले बामणे वस्ती या भागातील वादळी वाऱ्यामुळं अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळं घरातील संसार उपयोगी साहित्य आणि धान्याचं मोठं नुकसान झालं आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीमुळं केज तालुक्यातील कुंभेफळ परिसरात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यावेळी गारांचा इतका मोठा सडा पडला की, लोकांनी घरातून अगदी टोपल्यानं गारा भरुन बाहेर नेऊन टाकल्या आहेत. अचानक झालेल्या गारपिटीमुळं भाजीपाल्यासह फळबागांचही मोठे नुकसान झालं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here