Lioness Video: सिंहीण जंगल सफारीवर निघालेल्या पर्यटकांच्या थेट गाडीमध्ये शिरली अन्…

0

मुंबई,दि.२१: Lioness Video: एक सिंहीण जंगल सफारीवर निघालेल्या पर्यटकांच्या थेट गाडीमध्ये शिरली. अन् पुढे जे घडलं ते पाहून तुमचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. प्राण्यांना जंगलात शिकार करताना पाहण्याची मजा काही औरच असते. तिथे त्यांचं खरं रूप पाहायला मिळतं. अन् त्यामुळेच बहुतांश लोक जंगल सफारीवर जातात. पण जंगल सफारीवर फिरताना प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवण गरजेचं आहे. कारण प्रमाणापेक्षा जास्त जवळ गेल्यास ते हल्ला करू शकतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक सिंहीण जंगल सफारीवर निघालेल्या पर्यटकांच्या थेट गाडीमध्ये शिरली. अन् पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुमचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Lioness Video

सिंहीण जंगल सफारीवर निघालेल्या पर्यटकांच्या थेट गाडीमध्ये शिरली अन्… | Lioness Video

तर झालं असं की, काही पर्यटक एका गाडीत बसून जंगल सफारीचा आनंद घेत होते. विविध प्रकारचे प्राणी पाहात होते. तेवढ्यात एक सिंहिण त्यांच्या गाडीसमोर आली. अन् ती थेट त्यांच्या गाडीत शिरली. लक्षवेधी बाब म्हणजे या गाडीला कुठल्याही प्रकारचं सुरक्षा कवच नव्हतं. साधारपणे जंगल सफारीसाठी वारल्या जाणाऱ्या गाड्या या पूर्णत: बंधिस्त असतात. जेणेकरून कुठल्याही जंगली प्राण्यानं हल्ला केल्यास पर्यटक सुरक्षित राहतील. पण ही गाडी तर चहुबाजूंनी मोकळी होती. परिणीमी ती सिंहिण थेट पर्यटकांच्या अंगावर गेली. पण आश्चर्याची बाब म्हणजे तिनं कोणावरही हल्ला केला नाही. उलट ती सर्व पर्यटकांना मोठ्या प्रेमानं अभिवादन करू लागली. मग पर्यटक देखील तिला प्रेमानं कुरवाळू लागले. (Lioness Video)

ही सिंहिण जणू एखाद्या कुत्रा-मांजरीप्रमाणे पर्यटकांसोबत खेळू लागली. हा व्हिडीओ @TheFigen_ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ कोटी ८० लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. कारण सिंहीण ही सिंहापेक्षाही जास्त अक्रमक असते. पण इथे तर सिंहीण चक्क पर्यटकांसोबत खेळताना दिसत आहे. असो, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला?


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here