सोलापूर,दि.22: सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांच्याकडून सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज (दि .22) सकाळी स्वीकारला.
कुमार आशीर्वाद | Kumar Ashirwad
शासनाने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबतचे आदेश काल निर्गमित केलेले होते. त्यानुसार सन 2016 च्या बॅचचे सनदी अधिकारी असलेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची बदली मुंबई येथील महात्मा फुले जन आरोग्य सोसायटी आणि राज्य आरोग्य विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली आहे.