Buldhana Rain: गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरलं, शेतकरी वाहून गेल्याची घटना

0

बुलढाणा,दि.22: Buldhana Rain: गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरलं आहे. शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बुलढाणा जिल्ह्यात आभाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्यानं पाणी गावात शिरलं आहे. (Buldhana Rain)

गावांना पाण्याचा वेढा | Buldhana Rain

जळगाव जामोद तालुक्यातील काथरगाव आणि दुर्गादैत्य गावाला पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावात अनेक लोक अडकून पडले आहेत. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोसळधार पडणाऱ्या या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचंही नुकसान केल आहे. उभ पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदील झाले आहेत. गावात पाणी घुसलं आहे, नागरिक घरात अडकून पडले आहेत, मात्र अजूनही मदत मिळालेली नाहीये.

Buldhana Rain

शेतकरी वाहून गेला

दरम्यान दुसरीकडे संग्रामपूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. केदार नदीला महापूर आल्यानं संग्रामपूर तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलं आहे. एक शेतकरी देखील वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. मदन घुले असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे नागरिक भयभित झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here