जयराज नागणसुरे करणार आमदाराबाबत गौप्यस्फोट 

0

सोलापूर,दि.8: सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) एका आमदारांबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती सोलापूर वार्ताला मिळाली आहे. हे आमदार सत्ताधारी पक्षाचे की विरोधी पक्षाचे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी नागणसुरे यांनी बोगस नोंद उघडकीस आणली होती. 

नागणसुरे यांच्यामुळे एक बोगस नोंद उघडकीस आली आहे. सिटी सर्वे कार्यालयात अजून एक बोगस नोंद, सि.स.नं 10377/21 फा.प्लॉट नं 44/21 ही मिळकत शोभा रेवणसिद्ध कट्टीमनी व सुशीला मधुकर ढाले यांची मिळून सामायिक क्षेत्र 74.40 चौरस मीटर आहे. या मिळकत पत्रिकेवर शोभा रेवनसिद्ध कट्टीमनी हे नाव बोगस बक्षीस पत्राद्वारे नगर भूमापन कार्यालयात नोंद करण्यात आली.

जयराज नागणसुरे यांनी स्टिंग अॅापरेशन केले होते. स्टिंग अॅापरेशनचा व्हिडीओ समोर आला होता. सोलापूर नगर भूमापन कार्यालयात अनेक बोगस नोंदी असल्याचा आरोप नागणसुरे यांनी नुकताच केला होता. त्याचे वृत्त ‘सोलापूर वार्ता’ने दिले होते. यानंतर जयराज नागणसुरे यांनी स्टिंग अॅापरेशन करत भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. नागणसुरे हे सिटीसर्वे प्रमुख लिपीक सतीश कवडे यांच्याशी बोगस नोंदी संदर्भात माहिती विचारताना व्हिडीओत दिसत आहे. 

आता जयराज नागणसुरे हे विद्यमान आमदाराबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. नागणसुरे यांनी  याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. नागणसुरे काय गौप्यस्फोट करणार हे स्पष्ट झाले नाही. मात्र यामुळे या आमदाराच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसते. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर नागणसुरे यांच्या गौप्यस्फोटामुळे त्या आमदाराला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. 

अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here