जयराज नागणसुरे यांच्यामुळे अजून एक बोगस नोंद उघडकीस

0

सोलापूर,दि.31: जयराज नागणसुरे यांच्यामुळे अजून एक बोगस नोंद उघडकीस आली आहे. सिटी सर्वे कार्यालयात अजून एक बोगस नोंद, सि.स.नं 10377/21 फा.प्लॉट नं 44/21 ही मिळकत शोभा रेवणसिद्ध कट्टीमनी व सुशीला मधुकर ढाले यांची मिळून सामायिक क्षेत्र 74.40 चौरस मीटर आहे. या मिळकत पत्रिकेवर शोभा रेवनसिद्ध कट्टीमनी हे नाव बोगस बक्षीस पत्राद्वारे नगर भूमापन कार्यालयात नोंद करण्यात आली.

याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी देताच नगर भूमापन कार्यालयातून सदर बझार पोलीस ठाणे यांना या प्रकरणी गुन्हा दाखल करावा असे पत्र देण्यात आले. या पत्रावर सदर बझार पोलीस ठाण्याने पुरावे सादर करा असे पत्र नगर भूमापन कार्यालयाला दिले तरी या प्रकरणात कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

या उपर नगर भूमापन कार्यालयाचा हलगर्जीपणा म्हणजे शोभा कट्टीमनी यांचा उतारा बंद करण्यात आला नाही. तो आज ही चालू आहे. वास्तविक नगर भूमापन अधिकारी येवढे निर्ढावलेले आहेत की त्यांना त्याचे काहीही घेणे देणे नाही असे वागतात, असा आरोप जयराज नागणसुरे यांनी केला आहे.

कोणतीच कारवाई न करणार्‍या या कार्यालयात अनेक वेळा नागरिकांची बाचाबाची ही झाली आहे तरी सोलापूरकरांनी आपला उतारा व यस आय फाईल चेक करावे व या बोगस नोंदी करणार्‍या अधिकार्‍यांना सोलापूर करांनी जाब विचारावा, असे आवाहन जयराज नागणसुरे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here