मुंबई,दि.५: लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गेल्या काही काळापासून चर्चेत आलेल्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA Maharashtra) अखेर शिस्त लागायला सुरुवात झाली आहे. धडक आणि धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच राज्यातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या अवघ्या ६ दिवसांत एफडीएने (FDA) राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात धडक मोहीम (Anti-Gutkha Campaign) राबवत तब्बल २०३ ठिकाणी छापे टाकले आहेत. (Tukaram Mundhe News)
६ दिवसांत १०२ जणांना अटक, ६८ दुकाने-हॉटेल्स झाली सील | Tukaram Mundhe)
अन्न व औषध प्रशासन (Food and Drugs Administration) विभागाने घेतलेल्या या आक्रमक शोधमोहिमेमुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत १०२ जणांना अटक (Arrests) करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणारी राज्यभरातील जवळपास ६८ दुकाने आणि हॉटेल्स तातडीने बंद (Hotels and Shops Closed) करण्यात आली आहेत.
“लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, ही कारवाई यापुढे अधिक तीव्र होणार!” — तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.
धुळे महामार्गावर तब्बल १८.५० लाखांचा गुटखा जप्त (FDA Action In Dhule)
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने आपला मोर्चा अब महामार्गांवरील छुप्या वाहतुकीकडेही वळवला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून (Mumbai-Agra Highway) प्रतिबंधित गुटख्याची मोठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ४ मे रोजी धुळे जिल्ह्यात सापळा रचून एका वाहनातून तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा (Tobacco Products) साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी राजस्थानचा वाहनचालक सुरेश कुमार गोवरिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR Registered) करण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराच्या गर्तेतून एफडीएला बाहेर काढण्याचे आव्हान | Tukaram Mundhe Action
गेल्या काही दिवसांत लाचखोरीच्या प्रकरणांमुळे एफडीए विभागाची प्रतिमा बरीच मलीन झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (General Administration Department) २५ मे रोजी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी बदली केली. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मुंढेंनी विभागातील मरगळ झटकून कारवाईचा धडाका (Tukaram Mundhe Action) लावला आहे.
तक्रारीसाठी थेट प्लॅटफॉर्म; जनतेला मुंढेंचे आवाहन (Public Grievance Platform)
अन्न आणि औषधांबाबत किंवा गुटखा-पानमसाला अवैध विक्रीबाबत (Illegal Gutkha Sale) नेमकी कुठे तक्रार करायची, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. हीच अडचण ओळखून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेला थेट तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांसाठी एक विशेष प्लॅटफॉर्म (Complaint Platform) उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यासाठी टोल फ्री क्रमांक (Toll-Free Number) आणि ई-मेल आयडी (Email ID) जारी करण्यात आला आहे. यामुळे आता नागरिक थेट आयुक्तांकडे आपली तक्रार नोंदवू शकणार आहेत.








