मुंबई,दि.10: सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. एखादी व्यक्ती काय करुन प्रसिध्दी मिळवेल किंवा प्रसिध्दी मिळवण्यासाठी काय करेल हे सांगता येत नाही. माणूस कुठे डोकं लावेल आणि काय करेल याचा अंदाज लावू शकत नाही. अनेकदा काही लोक हटके कल्पना वापरुन काही गोष्टी करताना दिसतात तर अनेकदा जुगाडू लोकांचेही व्हिडीओ समोर येत असतात. सोशल मीडियावर अशा निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी कायमच पहायला मिळतात, व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क चालू ट्रकमध्ये झोका खेळताना पहायला मिळाला. हे दृश्य पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
कोणी चालू गाडीमध्ये साधं उभंही राहू शकत नाही, लोकांचा तोल जातो. मात्र एका पठ्ठ्याने चालू ट्रकमध्ये चक्क झोका खेळला. हा चकित करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याचा जुगाड पाहून सर्वच थक्क झालेत.
एका व्यक्तीने चालत्या ट्रकमध्ये झोका बांधला आहे आणि ते मस्त झुलताना दिसतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक ट्रक रस्त्यावरून जात आहे आणि एक व्यक्ती त्याच्या आत झोका खेळतोय. त्याच्या मागे दुसरा व्यक्ती ट्रकच्या टपवर आरामात बसलेला आहे. फक्त दोन-तीन जाड लोखंडी पाईप्स जोडलेले होते आणि त्याला व्यक्तीने आपला झुला बांधला होता आणि लहान मुलासारखा त्यावर डोलत होता. असा जुगाड तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. व्यक्तीचा थोडासाही तोल गेला असता तरी मोठी दुखापत घडली असती.
दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. badboy_6278m नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहेत.