नवी दिल्ली,दि.21: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली. अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत, वापरलेल्या कारच्या (इलेक्ट्रिक वाहनांसह) विक्रीशी संबंधित व्यवहारांवर GST 12% वरून 18% पर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
जीएसटी कौन्सिलने फोर्टिफाइड तांदळाच्या धान्यांवर 5% कराचा एकसमान दर लागू करण्याचा निर्णय घेतला. ते कोणत्या उद्देशासाठी वापरले जातात हे महत्त्वाचे नाही. यापूर्वी त्यावर वेगवेगळे कर लागू होते. त्यामुळे करप्रणाली थोडी अवघड झाली.
खाण्यासाठी तयार पॉपकॉर्नवरील जीएसटीबाबत परिषदेने स्पष्ट केले की, मीठ आणि नमकीनसारखे मसाले असलेले पॉपकॉर्न पॅकेजिंगशिवाय विकल्यास त्यावर 5% जीएसटी लागू होईल. याशिवाय प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या पॉपकॉर्नवर 12% GST भरावा लागेल.
याशिवाय 1,500 रुपयांपर्यंतच्या रेडीमेड कपड्यांवर पाच टक्के जीएसटी लागू होईल, तर 1,500 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर 18 टक्के जीएसटी लागेल. 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर 28 टक्के कर लागणार आहे. सध्या, 1,000 रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर पाच टक्के जीएसटी आहे, तर यापेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर 12 टक्के जीएसटी आहे.
जीएसटी काऊन्सिल बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हेल्थ आणि लाइफ इन्शुरन्स प्रिमियमवरील जीएसटी हटवावी, असा प्रस्ताव मंत्र्यांकडून ठेवण्यात आला होता. पण हा निर्णय जीएसटी काऊन्सिलच्या पुढील मिटींगवर ढकलण्यात आलाय. त्यामुळे लोकांना आपल्या इन्शुरन्सवर आधीच्या टॅक्स दराप्रमाणे प्रिमियम जमा करावा लागेल.