गुगलची नवी पॉलिसी लागू होणार, ३१ मे पासून ‘ही’ Apps बंद होणार

0

मुंबई,दि.७: गुगलची नवी पॉलिसी लागू होणार आहे. ३१ मे २०२३ पासून देशभरात गुगलची नवी पॉलिसी लागू होणार आहे. गुगलनं ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. गुगलचं नवीन आर्थिक सेवा धोरण जाहीर करण्यात आलंय. हे धोरण ३१ मे २०२३ पासून देशभरात लागू होणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या फोनमध्ये कर्ज देणारी ॲप्स असतील, ज्यामध्ये तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित असेल, तर तो डेटा हटवणं किंवा ३१ मे पूर्वी डेटा सुरक्षित करणं फायद्याचं ठरणार आहे. अन्यथा ३१ मे नंतर तुमचा वैयक्तिक डेटा हटवला जाईल.

गुगलची नवी पॉलिसी लागू होणार

वास्तविक, ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सवर अनेक दिवसांपासून फसवणूक होत असल्याचा आरोप होत असून, त्याबाबत केंद्र सरकार कठोर झालं आहे. यासोबतच कर्ज देणाऱ्या ॲपवर कर्ज देणाऱ्यांना त्रास दिल्याचेही आरोप झाले आहेत. अशा परिस्थितीत गुगलनं कर्ज देणाऱ्या ॲप्सवर मर्यादा आणल्या आहेत. याशिवाय युजर्सचा कॉन्टॅक्ट, लोन देणाऱ्या ॲप्सवरील फोटोची अशा संवेदनशील डेटाची चोरी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

गुगलकडून अपडेट

म्हणूनच Google ने अशा ॲप्ससाठी पर्सनल लोन पॉलिसी अपडेट जारी केले आहे. ज्यामुळे प्ले स्टोअरवरील कर्ज देणार्‍या ॲपवर बंदी घातली जाईल. या पॉलिसी अपडेटनंतर, ॲप्स युझर्सना एक्स्टर्नल स्टोरेजमधून फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट, लोकेशन आणि कॉल लॉगचा ॲक्सेस करता येणार नाही. मोबाईल ॲप्सच्या कर्जदारांकडून कर्जाच्या नावाखाली त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कर्जवसुली एजंट त्यांचे फोटो, संपर्क चुकीच्या पद्धतीने वापरतात असाही आरोप करण्यात आलाय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here