नागपूर: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल अलिकडच्या काळात वादग्रस्त वक्तव्ये (Controversial Statements) करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता यात प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांची भर पडली आहे. नागपूर येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवरायांच्या इतिहासाचा असा काही संदर्भ दिला की, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
काय आहे बागेश्वर बाबांचे विधान? (The Statement)
नागपूरमधील ‘भारतदुर्गा शक्तीपीठ’ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले होते. ते रामदास स्वामींकडे गेले आणि म्हणाले की, आता मी युद्ध लढू शकत नाही. त्यांनी आपला मुकुट खाली ठेवला आणि स्वामींना राजपाट सांभाळण्याची विनंती केली.”
या वादग्रस्त वक्तव्यात (Controversial Statement) पुढे दावा करण्यात आला की, रामदास स्वामींनी महाराजांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि तो मुकुट पुन्हा त्यांच्या डोक्यावर ठेवून राज्य चालवण्याची आज्ञा दिली. इतिहासातील या संदर्भावरून आता शिवप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत विधान (Political Presence)
या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करतानाच एक अजब आवाहनही केले. “प्रत्येक हिंदू कुटुंबाने चार मुले जन्माला घालावीत आणि त्यातील एक मुलगा संघासाठी स्वयंसेवक (Volunteer) म्हणून द्यावा,” असे ते म्हणाले
.

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले (Maharashtra Politics)
राज्यात आधीच आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीमुळे वातावरण तापलेले आहे. हा महाराष्ट्रामधील (Maharashtra Politics) वाद ताजा असतानाच, आता नागपूरमधील (Nagpur News) या घटनेने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. महापुरुषांचा चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे.








