दि.७: Exit Poll 2022: पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १० मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश(Uttar Pradesh), पंजाब (Punjab), मणिपूर (Manipur), उत्तराखंड (Uttrakhand) आणि गोवा (Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. विविध वृत्तवाहिन्यांचा एक्झिट पोल येत आहे.
देशातील पहिला एक्झिट पोल १९९६ साली झाला
राजधानी दिल्लीतील सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) ने केलेला एक्झिट पोल हा देशातील पहिला एक्झिट पोल मानला जातो. दूरदर्शनने १९९६ साली देशातला पहिला एक्झिट पोल घेतला होता.
पंजाब वगळता इतर म्हणजे उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. या राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता कायम राखेल असा दावा पक्षाने केला आहे. दुसरीकडे काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षाने विजयी होण्याचा दावा केला आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश(Uttar Pradesh), पंजाब (Punjab), मणिपूर (Manipur), उत्तराखंड (Uttrakhand) आणि गोवा (Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. विविध वृत्तवाहिन्यांचा एक्झिट पोल येत आहे.
देशातील पहिला एक्झिट पोल 1996 साली झाला
राजधानी दिल्लीतील सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) ने केलेला एक्झिट पोल हा देशातील पहिला एक्झिट पोल मानला जातो. दूरदर्शनने 1996 साली देशातला पहिला एक्झिट पोल घेतला होता.
पंजाब वगळता इतर म्हणजे उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. या राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता कायम राखेल असा दावा पक्षाने केला आहे. दुसरीकडे काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षाने विजयी होण्याचा दावा केला आहे.
उत्तर प्रदेश
संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदानाची प्रक्रिया आज आटोपली आहे. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या काही जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा उत्तर प्रदेशमध्ये अडीचशेपेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, तर समाजवादी पक्षही १०० हून अधिक जागांवर विजयी होईल, असा कल रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ४५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ३५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये रूपांतर केले असता उत्तर प्रदेशात भाजपाला २६२ ते २७७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १३४ जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाला ७ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ३ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
रिपब्लिकच्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार
भाजपा – २६२-२७७
सपा – ११९-१३४
बसपा – ७-१५
काँग्रेस – ३-८
पंजाब
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार येईल, असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवला आहे. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबमधील काँग्रस सरकारला मोठा धक्का बसताना दिसत आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा करिश्मा पंजाबमध्ये पाहायला मिळत आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण ११७ जागा आहेत. यापैकी ७६ ते ९० जागांवर आम आदमी पक्षाला यश मिळेल, असं सर्वेक्षण सांगतं. तर गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. काँग्रेसला १९ ते ३१ जागा मिळतील असा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपसोबतची युती तोडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाला ७ ते ११ जागा मिळू शकतात.
पंजाबमध्ये आपला ४१ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार येईल. गेल्या निवडणुकीत आपनं २० जागा जिंकल्या होत्या. या जागा आता चौपट होताना दिसत आहेत. पंजाबमध्ये आपला २८ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. भाजपला ७ टक्के मतं मिळू शकतात.
उत्तराखंडमध्ये भाजपचीच सत्ता कायम राहणार
टाईम्स नाऊ-व्हिटोच्या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला ४४ ते ५० जागा मिळू शकतात. काँग्रेसला १२ ते १५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला ५ ते ८ जागांवर यश मिळू शकतं. उत्तराखंडात विधानसभेच्या ७० जागा आहेत.
इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये भाजपला ३६ ते ४६ जागा मिळू शकतील. तर काँग्रेसला २० ते ३० जागांवर समाधान मानावं लागेल. न्यूज २४ चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ४३, काँग्रेसला २४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक पी मार्कच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ३६ ते ४२, तर काँग्रेसला २५ ते ३१ जागा मिळण्याची अंदाज वर्तवला गेला आहे.