Home क्राइम न्यायालयाने युक्तिवाद मानला, भाजप नगरसेविका शालन शिंदेंचा जामीन झाला!

न्यायालयाने युक्तिवाद मानला, भाजप नगरसेविका शालन शिंदेंचा जामीन झाला!

0
शालन शिंदे

सोलापूर,दि.७: शहरात खळबळ उडवणाऱ्या बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेत असलेल्या भाजप नगरसेविका शालन शिंदे (Shalan Shinde) यांना अखेर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून जामीन मंजूर झाला आहे. तब्बल सात महिन्यांनंतर शिंदे यांना दिलासा मिळाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

२ जानेवारी २०२६ रोजी सोलापूरातील हनुमान मंदिर परिसरात बाळासाहेब सरवदे यांची तलवार आणि कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास करत शालन शिंदे यांना या कटातील प्रमुख सूत्रधार म्हणून अटक केली होती.

दरम्यान, जामीनासाठी झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाचे ॲड. रितेश थोबडे आणि ॲड. अभिजीत इटकर यांनी जोरदार युक्तिवाद मांडत शिंदे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप कमकुवत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दुसरीकडे, सरकार पक्षाकडून ॲड. ए. ए. टकळकर यांनी जामीनास तीव्र विरोध करत गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य केला आणि शालन शिंदे यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.