मुंबई,दि.६: Congress On BJP: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) उल्लेख करत काँग्रेसने (Congress) मोठा दावा केला आहे. काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे. “आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे”, असा मोठा दावा काँग्रेसने केला.
काँग्रेसचा मोठा दावा | Congress On BJP
काँग्रेसने म्हटलं, “मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत. यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे.”
जनतेत सरकारविरोधी मोठी लाट
“भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे. मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे. इतकंच नाही, तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर येत आहे,” असा दावा काँग्रेसने केला आहे.
विद्यमान ६० टक्के आमदारांचं तिकीट कापावं
“हा सर्व्हे समोर आल्यानंतर मध्य प्रदेश भाजपात खळबळ उडाली आहे. तसेच विद्यमान ६० टक्के आमदारांचं तिकीट कापावं अशी सुचनाही येत आहे,” असाही दावा काँग्रेसने केला.