Chandrababu Naidu Arrest: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

0

मुंबई,दि.९: Chandrababu Naidu Arrest: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना शनिवारी भल्या पहाटे अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री उशीरा त्यांना अटक वॉरंट देण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह खुद्द चंद्राबाबू नायडूंनीही अशा प्रकारे आपल्याला अटक केली जाण्याला विरोध केला. मात्र, अखेर सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली असून आता वैद्यकीय तपासणीनंतर चंद्राबाबू नायडूंची रवानगी तुरुंगात होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधूनच त्यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्राबाबू नायडू यांच्यावर कौशल्य विकास घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चंद्राबाबू यांचे नाव सामील करण्यात आले आहे. या प्रकरणी चंद्राबाबू नायडू यांनी २५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांची माहिती पोलिसांनी दिली आहे. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या वकिलांनी तपास अधिकार्‍यांना प्रथमदर्शनी पुरावे देण्याची विनंती केली. चंद्राबाबू नायडू यांच्या नावाचा एफआयआर अहवालात उल्लेख नसल्याचा दावा करण्यात आला. 

Chandrababu Naidu Arrest: चंद्राबाबू नायडू यांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू यांची वैद्यकीय तपासणी झाली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी एका दौऱ्यादरम्यान नंद्याल जिल्ह्यातील बनगनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केले होते. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी सीआयडीचे पथक तेथे पोहोचले. परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडीला त्यांना अटक करू दिली नाही.

Chandrababu Naidu Arrest

टीडीपी पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशच्या सीआयडी पथकात मोठी वादावादी झाली. त्यानंतर सकाळी ६ च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले. त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेसाठी नोटीस जारी करण्यात आली होती. चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला, मात्र पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केल्याचे सांगत तपशील देण्यास नकार दिला. चंद्राबाबू नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अहवाल देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंद्राबाबू नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे मान्य केले. यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना घेऊन जाताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीसमोर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी त्यांना हटवून चंद्राबाबू नायडू यांना तिथून वैद्यकीय तपासणीसाठी नेले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here