Apple iPhone 15 सिरीज या तारखेला होऊ शकते लाँच

0

नवी दिल्ली,दि.७: बहुप्रतिक्षीत अशी Apple iPhone 15 सिरीज पुढील महिन्यात लाँच होणर असल्याचं दिसून येत आहे. Apple iPhone 15 ची वाट पाहिली जात आहे. गेल्या काही सिरीजपासून आयफोनमध्ये फारसे काही वेगळे लोकांना मिळत नाहीय. यामुळे फक्त स्टेटस म्हणून आणि हौस म्हणून लोक गेल्या काही सिरीज घेत आहेत. ॲपल लाँच इव्हेंट १२ किंवा १३ सप्टेंबर रोजी केला जाऊ शकतो. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, नवीन iPhones 15 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो आणि २२ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. गेल्या आठवड्यात, 9to5Mac ने अहवाल दिला होता की १३ सप्टेंबर रोजी या आगामी स्मार्टफोन लाँचची घोषणा करण्यासाठी अनेकांची सुट्टी कंपनीने नाकारली होती.

Apple सहसा कार्यक्रमाच्या तारखेच्या एक आठवडा आधी मीडिया आमंत्रणे पाठवते. iPhone 15 लाइनअप सोबत, सप्टेंबरच्या इव्हेंटमध्ये Apple Watch Series 9 आणि Apple Watch Ultra 2 मॉडेल्स, iOS 17 चे अंतिम लाँच अपडेट आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स देखील असू शकतात. यावर्षी Apple iPhone 15 मालिकेत ४ नवीन स्मार्टफोन – iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max आणले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आयफोन 15 प्रो मॉडेल सध्याच्या मॉडेल्सपेक्षा महाग असू शकतात.

विश्लेषक टिम लाँग यांनी अलीकडेच दावा केला आहे की Apple iPhone 15 Pro मॉडेल सध्याच्या मॉडेल्सपेक्षा महाग असतील, आशियातील पुरवठा साखळी कंपन्यांशी झालेल्या संभाषणांनंतर हे सांगितलं आलं होतं. MacRumours च्या मते, iPhone 15 Pro ची किंमत $100 पर्यंत असू शकते. हे आयफोन १४ प्रो पेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, iPhone 15 Pro Max ची किंमत $100 ते $200 असू शकते, जी iPhone 14 Pro Max पेक्षा जास्त असेल. नियमित iPhone 15 आणि iPhone 15 Plus ची किंमत अनुक्रमे सुमारे $799 आणि $899 असेल. iPhone 15 Pro ची किंमत $1,099 पर्यंत असू शकते आणि मोठ्या iPhone 15 Pro Max ची किंमत $1,299 पर्यंत असू शकते.

Apple iPhone 15 सिरीज

आयफोन 15 प्रो मॅक्स पेरिस्कोप तंत्रज्ञानासह अपग्रेड केलेल्या टेलीफोटो लेन्ससह येईल. जो iPhone 14 प्रो मॉडेलच्या 3x च्या तुलनेत 5-6x ब्लर-फ्री झूमला सपोर्ट करेल. प्रो मॉडेल्समध्ये यूएसबी-सी पोर्ट, टायटॅनियम फ्रेम, अॅक्शन बटणं, वेगवान A17 बायोनिक चिप, स्लिम डिस्प्ले बेझल्स, वाय-फाय 6E सपोर्ट, वाढलेली रॅम आणि अपग्रेड केलेली अल्ट्रा वाईडबँड चिप यासह अनेक नवीन फीचर्स असतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here