अक्कलकोट,दि.30: Akkalkot Accident: अक्कलकोट तालुक्यात क्रुझर टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण ठार झाले आहेत. शिरवळवाडी (अक्कलकोट) येथे जीप आणि टॅकरचा अपघातात सहा भाविक ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
अक्कलकोट तालुक्यात क्रुझर टँकरचा भीषण अपघात | Akkalkot Accident
दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या उर्वरित सहा ते सात जखमींना अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार देवदर्शनकडून करून गावाकडे जात असताना भीषण अपघात झाला आहे. अपघातातील सर्वजण कर्नाटकातील अणूर (ता.आळंद) गावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोटचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी झाले आहेत.

अपघातग्रस्त गाडी कर्नाटक पासिंगची असल्याची माहिती मिळत आहे. देवदर्शन करुन गावाकडे जात असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये कर्नाटकातील अणूर (ता. आळंद) गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती परिसरातील गावांमध्ये समजतात मदत कार्य वेगाने सुरू झाले असून जखमींना रुग्णालयाकडे आणले आहे.