Akelli Trailer: अकेली चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

0

मुंबई,दि.५: Akelli Trailer: अकेली चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाच्या आगामी ‘अकेली’ चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाल्यापासूनच चाहते ट्रेलर व चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये नुसरत तिचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.

नुसरत भरुचाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात युद्धग्रस्त इराकमध्ये एकट्या अडकलेल्या एका भारतीय मुलीची कहाणी दाखविण्यात आली आहे. युद्धग्रस्त परिस्थितीत स्वतःचा जीव वाविण्यासाठी तिला करावा लागलेला संघर्ष पाहायला मिळत आहे. तसेच ट्रेलरमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे चित्रण अतिशय उत्तमरित्या करण्यात आले आहे. नुसरत नोकरीसाठी इराकमध्ये जाते आणि तिथे अडकते त्यानंतर तिला जीव वाचविण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाची कथा ‘अकेली’मध्ये पाहायला मिळते.

Akelli Trailer

Akelli Trailer: अकेली चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

चित्रपटाचा ट्रेलर खूप उत्कंठावर्धक आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला नुसरत भरुचा बुरखा घालून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण काही सशस्त्र लोकांनी तिला घेरल्याचं दिसतं. कुटुंबापासून दूर इराकमध्ये असलेल्या या तरुणीला इतर मुलींसोबत बंदी बनवलं जातं. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचा घृणास्पद खेळ या ट्रेलरमध्ये दाखवला जातो.

‘अकेली’मध्ये नुसरत भरुचा व्यतिरिक्त निशांत दहिया, त्साही हालेवी आणि अमीर बुत्रस हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १८ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणय मेश्रामने केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here