कोल्हापूर,दि.१५: Ajit Pawar-Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. दोघेही शनिवारी दिवसभर पुण्यात होते. त्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळत होती. जयंत पाटील हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: त्या दिवशी काय झालं याची माहिती दिली. (Ajit Pawar-Sharad Pawar)
“…गेलो तरी कधी बाहेर पडायचं हे मी ठरवणार” अजित पवार | Ajit Pawar-Sharad Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांना गुप्त भेटीच्या चर्चेवर माहिती दिली. अजित पवार म्हणाले, मी बैठकीला लपून गेलेलो नाही, मी उघड फिरणारा कार्यकर्ता आहे. मी उद्या कोणाच्याही घरी गेलो तरी कधी बाहेर पडायचं हे मी ठरवणार, असं स्पष्ट अजित पवार यांनी सांगितले.
“उद्योगपती अतुल चोरडीया यांचे वडील शरद पवार यांचे क्लासमेंट होते. त्या दिवशी पवार साहेब व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. मी चांदणी चौकातील कार्यक्रम संपवून येणार होतो. त्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही होते. चोरडीया यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होते, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, पुण्यातील भेटीला कोणीही वेगळं वळण देऊ नये. आम्ही नात्यातील आहे अशा भेटी होतं राहणार त्यामुळे या संदर्भात संभ्रम निर्माण करु नका. राज्यात दरवर्षी जसा पाऊस पडतो तसा यावेळी पडलेला नाही. काही ठिकाणी धरण भरली आहेत, अजुनही काही ठिकाणी टँकरने पाणी द्यावं लागतं. राज्यातील ७५ वर्षावरील वृद्धांना एसटीने प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात हद्दवाढ होणे खूप गरजेचे आहे, हद्दवाढ संदर्भात काहीजण चुकीची माहिती पसरवत आहेत. हद्दवाढ करण्याच्या विरोधात असणाऱ्यांनी देखील याला सहकार्य करणे गरजेचे आहे. पुढील ५० वर्षाचा विचार करून आपल्याला सर्व नियोजन करावे लागेल, असंही पवार म्हणाले.