Ajit Pawar On Alcohol: “तर अनेकांना अख्खा खंबा घेतला तरी…” अजित पवार

0

पुणे,दि.२८: Ajit Pawar On Alcohol: द्राक्ष बागायतदार परिषद पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवार हे जसे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात तसे जाहिर कार्यक्रमातील भाषणात सहज चिमटेही काढतात. त्याचाच प्रत्येय आज आला. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात द्राक्ष बागायतदार परिषद पार पडली. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अजित पवार आले होते. यावेळी अजित पवार यांनी थेट वाइनवर बोलत असताना जोरदार फटकेवाजी केली. “अनेकांची कॅपिसिटी वेगवेगळी असते. अनेकांना पहिल्या धारेने किक बसते तर अनेकांना अख्खा खंबा घेतला तरी किक बसत नाही” असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

अजित पवारांची फटकेबाजी | Ajit Pawar On Alcohol

अजित पवार म्हणाले, दर्दी लोक सांगतात इतर काही गोष्ट घेतली की किक बसते, वाइन ने किक बसत नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी कधीच त्या गोष्टीला स्पर्श केला नाही. माझ्या सोबत काम करणाऱ्या अनेकांना माहिती आहे. पुढे ते म्हणाले, आदरणीय पवार साहेब नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतातच. म्हणूनच काल या परिषदेच्या शुभारंभाला पवार साहेब होते, आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार- पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं पवारच आहेत. आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here