Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

0

लखनऊ,दि.७: Yogi Adityanath threatened to kill: असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) हे ३ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर गेले होते. मेरठ येथील कार्यक्रम आटोपून दिल्लीला परतत असतानाच हापुडमधील एका टोलनाक्यावर ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती तर ओवेसी यांनीही संसदेला या घटनेबाबत अवगत करत तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर ‘लेडी डॉन’ नावाच्या एका बनावट ट्विटर अकाउंटवर योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची वाहने बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

ट्विटमध्ये हापूर पोलिसांनाही टॅग करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास दक्षता पथक करत आहे. हापूर पोलिसांनीही याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

ओवेसी तो मोहरा है

‘ओवेसी तो मोहरा है… असली निशाणा तो योगी आदित्यनाथ है’, अशी धमकी योगी आदित्यनाथ यांना लेडी डॉन नावाच्या बनावट ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे. आता लवकरच भाजप नेत्यांच्या वाहनांवर RDX ने हल्ला केली जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे. यूपी पोलिसांनी ट्विटमध्ये टॅग करण्यात आलं आहे. आपल्या टीमकडे बघा, दिल्लीकडे पाहू नका. योगीना ठार करणार. लखनऊ रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकासह मेरठमध्ये १० ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचीही धमकी दिली गेली आहे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here