Mohammed Siraj | “धर्माच्या नावाखाली…” क्रिकेटर मोहम्मद सिराज

0

मुंबई,दि.२३: मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील (Pahalgam) बैसरन येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी निवडकपणे पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

मोहम्मद सिरजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना आणि संताप व्यक्त केला आहे. सिराजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना हे राक्षसी कृत्य असून, दहशतवाद्यांना शिक्षा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. 

Mohammed Siraj On Pahalgam

धर्माच्या नावाखाली…

“नुकतंच पहलगाम येथे झालेल्या भयानक आणि धक्कादायक दहशतवादी हल्ल्याबद्दल वाचलं. धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लक्ष्य करुन हत्या करणं हे पूर्णपणे राक्षसी आहे. कोणतंही कारण, विश्वास, विचारसरणी या राक्षसी कृत्याचं समर्थन करु शकत नाही,” असं मोहम्मद सिराजने म्हटलं आहे.

 “कुटुंबांना किती वेदना आणि आघात सहन करावा लागत असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. कुटुंबांना या असह्य दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. तुमच्या नुकसानाबद्दल आम्हाला खूप वाईट वाटते. मला आशा आहे की हे वेडेपणा लवकरच संपेल आणि या दहशतवाद्यांना शोधून काढत दया न दाखवता शिक्षा व्हावी, ही कोणती लढाई आहे, ज्यामध्ये माणसाच्या आयुष्याची काही किंमत नाही?,” अशी विचारणाही सिराजने केली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here