श्री सिद्धेश्वर यात्रा: लाखोंच्या उपस्थितीत पार पडला अक्षता सोहळा

0

सोलापूर,दि.13: सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा सोमवारी दुपारी लाखो लोकांच्या उपस्थित पार पडला. यात्रेची 900 वर्षांची परंपरा आहे. शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेत सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग असतो. सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडला.

तत्पूर्वी आज यात्रेतील प्रमुख मानकरी हिरेहब्बू वाड्यापासून ढोल, ताशाच्या गजरात नंदीध्वजाच्या मिरवणुका निघाल्या. नंदीध्वज व पालखीतील ग्रामदैवत श्री च्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दुतर्फ रस्त्यावर उभे होते.

ओम सिद्धरामा नम:… दिड्ड्यम् दिड्ड्यम्… सत्यम् सत्यम्… नित्यम् नित्यम् या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले अन् लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी 2 वाजता सुरुवात झाली. एकदा भक्तलिंग बोला… हर्र… बोला हर्र..चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता. अक्षता सोहळ्याला यंदाही लाखों भक्तांची उपस्थिती होती.

‘शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जय’ या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here