कंडक्टरने केली निवृत्त IAS अधिकाऱ्याला मारहाण

0

मुंबई,दि.13: बस कंडक्टर आणि माजी आयएएस अधिकारी यांच्या 10 रुपयांवरुन वाद झाला. जयपूरमध्ये एका निवृत्त वृद्ध IAS अधिकाऱ्याला बसमध्ये मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कनोटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 रुपयांच्या भाड्यावरून वाद वाढल्याने कंडक्टर बसस्थानकावर उतरला नाही तेव्हा सेवानिवृत्त अधिकाऱ्याने त्याला बस थांबवण्यास सांगितले. आधी IAS अधिकाऱ्यांनी कंडक्टरच्या कानशीलात लगावली. कंडक्टरने चापट मारली आणि नंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त आयएएसला वाचवले. 10 रुपये भाडे आणि योग्य बसस्थानकावर न उतरल्याने हा वाद झाला. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने कनोटा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोडवेज विभागाने कंडक्टरला तत्काळ निलंबित केले. 

काय प्रकरण?

शुक्रवारी जयपूरमध्ये ही घटना घडली. 75 वर्षीय निवृत्त IAS अधिकारी बसने प्रवास करत कनोटा येथे जात होते. बसमध्ये बसल्यावर त्यांनी कनोटाचे तिकीटही काढले होते. दरम्यान अर्ध्या प्रवासात पोहोचताच त्यांना झोप लागली. त्यामुळे त्यांना कनोटा बस स्थानकावर उतरता आले नाही. बस कानोटा येथून निघताच त्यांना जाग आली. आपण बस स्थानकापासून बरेच पुढे आल्याचे कळताच IAS अधिकाऱ्यांनीनी कंडक्टरला बस थांबवण्यास सांगितली.

दरम्यान बस कंडक्टरने बस थांबवली नाहीच. उलट निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून अधिकचा प्रवास केल्यामुळे आणखी 10 रुपये मागितले. याचा IAS अधिकाऱ्यांना राग आला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि राग अनावर न झाल्यामुळे आधी IAS अधिकाऱ्यांनी कंडक्टरच्या कानशीलात लगावली. त्यामुळे कंडक्टरनेही अधिकाऱ्यांना चांगला चोप दिला. या प्रकरणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here