लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा

0

मुंबई,दि.9: लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यात पात्र महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळणार आहेत. या योजनेनरून वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. विरोधी पक्षातील सावत्र भाऊ ‘लाडकी बहीण’ योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करताहेत अशी टीका शिंदे सरकारने केली होती. 

विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा

‘लाडकी बहीण’ योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भाऊ प्रयत्न करताहेत अशा शिंदे सरकारच्या टीकेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. अडीच वर्षांत लाडकी बहीण आठवली नव्हती का, असा सवाल करतानाच, महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे, आम्ही तीन हजार रुपये देऊ, असे वडेट्टीवार म्हणाले.

‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होत आहे. हे आरोप फेटाळून लावत दुसऱ्याला सावत्र भाऊ म्हणता, पण खऱ्या अर्थाने महायुती सरकारच महाराष्ट्रातील महिलांचा शत्रू आहे, असे ते म्हणाले. महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला तेव्हा लाज वाटत नाही. दीड हजार देण्यापेक्षा महिलांच्या संरक्षणाची हमी दिली असती तर आशीर्वाद मिळाला असता, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here