रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात कारवाई, भाजपा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

0

बेंगळुरू,दि.5: बेंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन संशयितांशी संबंध आहेत.

एनआयएने भाजपा कार्यकर्ता साईप्रसाद यांना ताब्यात घेतले आहे. एनआयएने साईप्रसादला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात एनआयएने शिवमोगा येथे छापा टाकला होता. यावेळी मोबाईल शॉपी आणि दोन संशयितांच्या घरावर छापे टाकण्यात आले. आरोपीचे नाव मोबाईल शॉपीमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. 

1 मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत. कॅफेमध्ये आयईडी बॉम्बस्फोट टायमर वापरून करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here