History of Solapur: सोलापुरातील या भागात 31 ऑगस्ट रोजी होतो स्वातंत्र्य दिन साजरा

0

सोलापूर,दि.1: History of Solapur: देशभरात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. मात्र सोलापुरातील एका भागात 31 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. सोलापुरातील सेटलमेंट भागात 31 ऑगस्ट हा दिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त येथे असलेल्या सर्व समाजाच्या वतीने गुरुवारी सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 1 जुना वांगी रोड लिमयेवाडी परिसरातील शहानगर चौकात नारायण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजबांधवांनी मिठाई वाटप करून विमुक्त दिन साजरा केला.

यामुळे 31 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो | History of Solapur

ब्रिटिश राजवटीत भटक्या-विमुक्त जमातीला सेटलमेंट परिसरात तारेच्या कुंपणात बंदिस्त करण्यात आले होते, त्यांना 31 ऑगस्ट 1952 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशाने त्यांना मुक्त करण्यात आले. हा दिवस येथे राहणारे दहापेक्षा अधिक समाजातील बांधव स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात.

यावेळी टकारी समाजाचे अध्यक्ष सुनील जाधव, युवक अध्यक्ष अनिल जाधव, बालाजी जाधव, रमेश जाधव, प्रकाश गायकवाड, राजू जाधव, युवराज जाधव, अंबादास गायकवाड, महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनी जाधव, ज्ञानेश्वर जाधव,अंबादास जाधव, आनंद गायकवाड, शिवाजी जाधव, गोविंद गायकवाड आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here