सोलापूर,दि.20: सोलापूरच्या कन्या आणि तामिळनाडू लाचलुचपत प्रतिबंधक महानिरीक्षक विद्या कुलकर्णी यांची सीबीआय सहसंचालकपदी (CBI Joint Director) नियुक्ती करण्यात आली आहे. (Vidya Kulkarni has been appointed as CBI Joint Director)
विद्या कुलकर्णी या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे (उत्तर सोलापूर ) येथील आहेत. केंद्र सरकारने तामिळनाडू लाचलुचपत प्रतिबंधक आणि गुप्तचर विभागाच्या पोलीस महासंचालक विद्या कुलकर्णी यांची सीबीआयच्या सहसंचालकपदी नियुक्ती केली आहे.
विद्या कुलकर्णी यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा आदेश जारी केला आहे. विद्या कुलकर्णी, 1998 पासून तामिळनाडूच्या आयपीएस अधिकारी, 5 वर्षांपासून सीबीआयच्या सहयोगी संचालक (Associate Director of CBI) म्हणून कार्यरत आहेत. विद्या कुलकर्णी यांच्या निवडीनंतर सोलापुरात आनंद व्यक्त केला जात आहे.