कारच्या भीषण अपघाताचा व्हिडिओ, अपघात होताच…

0

नवी दिल्ली,दि.20: देशभरात आणि जगभरात दररोज अनेक अपघात होतात. सोशल मीडियावर अनेकदा अशा भीषण अपघाताचे व्हिडिओ (Video) व्हायरल होतात. वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात होतात. अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. भीषण अपघात झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महामार्ग दिसत आहे जिथे दोन कारची टक्कर होऊन एक प्रवासी हवेत उंच फेकला जातो. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की ही व्यक्ती हवेत जवळपास 20 फुटांपर्यंत उंच उडाली. 

कारच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल | Video Viral

व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही आणि व्हिडिओ ट्विटरवर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5.4 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा एक जुना व्हिडिओ आहे जो काही दिवसांपूर्वी ट्विटरवर Vicious Videos नावाच्या पेजने शेअर केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “सीटबेल्ट लावा” असं म्हटलं आहे. एका ट्विटर युजरने कमेंट बॉक्समध्ये आपला अनुभव शेअर केला आहे. 

“मला माहीत आहे की माझ्या मित्राच्या भावाचा अपघात झाला आणि कारचं देखील मोठं नुकसान झालं. त्याने सीट बेल्ट लावला नव्हता आणि विंडशील्डला आदळल्यानंतर तो उडला आणि जमिनीवर पडला. सुमारे महिनाभर तो कोमात राहिला. लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे त्याने सीट बेल्ट लावला असता तर कार पूर्णपणे चिरडल्याने कारमध्येच त्याचा मृत्यू झाला असता. मी असे म्हणत नाही की सीट बेल्ट लावू नका, परंतु हा योगायोग आहे की त्याने सीट बेल्ट लावला नव्हता आणि तो आता सुरक्षित आणि निरोगी आहे.”

असे अपघात घडतच असतात, त्यामुळे रस्त्यावरून सावध राहण्याची गरज आहे. अपघाताला बळी पडू नये असं वाटत असेल तर नेहमी वाहतुकीचे नियम पाळा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. या व्हिडीओवर इतर अनेकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “सीट बेल्ट काम करतं. माझाही अपघात झाला होता आणि माझी कार खराब झाली होती. फक्त माझ्या सीट बेल्टमुळे मला किरकोळ दुखापत झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here