४५ लांखाचे सोन्याचे बिस्कीट लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना केले जेरबंद

0

सोलापूर,दि.१४: सांगोला तालुक्यात दुचाकीला धडक देऊन ४५ लाख रूपयांचे ९२५ ग्रॅम सोन्याचे विस्कीट चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी तक्रार दाखल होताच अवघ्या ४८ तासांत मुद्देमालसह ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या चोरीमध्ये फिर्यादीच्या मित्राचाच समावेश असून त्यानेच मोठा वनाव केला असल्याचे तपासात पुढे आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील दीपक प्रकाश जावळेकर (वय २३), अनिल चंद्रकांत भोसले (वय २३, रा. मिरज) व प्रशांत पाटील (वय २१, रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप एक आरोपी फरार आहे.

दरम्यान  याबाबत,सुशांत बापुसो वाघमारे रा. दिघंची ता. आटपाडी याने १० नोव्हेंबर रोजी फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध भादंवि सं.का.क ३९४,३९७,२७९,४२७  प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मिरज येथील इसमांकडे चौकशी केली असता त्यातील इसम हा सांगलीतील होमगार्ड असून तो व्यसनाधीन आहे तर दुसरा इलेक्ट्रिक दुकानात सेल्समन म्हणून कामास असून शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने कर्ज बाजारी झाला आहे. त्यामुळे त्याने मित्राच्या मदतीने सदर गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले .सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पुणे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, फौजदार ख्याजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोयेकर, चालक समीर शेख, सांगोला पोलीस स्टेशनचे राहुल देवकाते, राहुल मोरे, सायबर सेलचे अन्वर अत्तार यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here