स्वामी समर्थ हे तर या ब्रम्हांडाचेच डॉक्टर आहेत: डॉ. धनंजय पाटील

रुग्णांची रुग्णसेवा ही एक प्रकारची स्वामी सेवाच: डॉ. धनंजय पाटील

0

सोलापूर,दि.9: श्री स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात अनेक दिनदुबळ्यांना, आजारी लोकांना आपल्या आशीर्वादाने बरे केले आहे. स्वामी समर्थ हे तर या ब्रम्हांडाचेच डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व स्वामीभक्त सुखाने जीवन जगत आहोत. मीही एक निस्सीम स्वामीभक्त आहे. मी जरी पदवीने डॉक्टर असलो तरी स्वामी भक्तीनेच मीही या मानवी जीवनाचा आनंद घेत आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील (Dr. Dhananjay Patil) यांनी केले.

रुग्णांची रुग्णसेवा ही एक प्रकारची स्वामी सेवाच: डॉ. धनंजय पाटील

पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, “तो आनंद मी माझ्या कामातून पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो, त्यामुळे माझ्या हातून होणारी रुग्णांची रुग्णसेवा ही एक प्रकारची स्वामी सेवाच आहे.”

डॉ. पाटील यांनी नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी डॉ. पाटील व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन वायचाळ आदींचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ.पाटील बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव उर्फ भारत शिंदे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, परतरेड्डी चेंडके इत्यादी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here