न्यायाधीशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाच निलंबन

0

गडचिरोली,दि.26: न्यायाधीशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाच निलंबन करण्यात आले आहे. गडचिरोलीच्या चामोर्शी येथील पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचं निलंबन करण्यात आले आहे. खांडवेंविरोधात आदेश दिला म्हणून न्यायाधीशांना घरी जाऊन शिवीगाळ केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

न्यायाधीशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाच निलंबन

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या निवडणूक काळात निलंबित पोलिस निरीक्षकाने बाजार समितीचे माजी सभापती नेते अतुल पवार यांना मारहाण केली होती. त्याविरोधात अतुल पवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने राजेश खांडवे यांच्यावर 294, 324, 323, 42 भा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. राग मनात ठेवून राजेश खांडवेंनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी निलंबनाचे आदेश केले.

चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी 21 एप्रिल ला चामोर्शी कृषिउत्पन बाजार समितीचे माजी सभापती नेते अतुल यांना बेदम मारहाणकेली होती. यात अतुल पवार यांचा हात फ्रॅक्चर तर मानेवर जखमा झाले होते. चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून घडला होता. खांडवे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात विलंब झाला त्याविरोधात गण्यारपवार हे कोर्टात गेले. कोर्टानं खांडवेंविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. याचा राग आल्यानं राजेश खांडवे यांनी गुरूवारी पहाटे 5 वाजता न्यायाधीशांच्या घरी जाऊन शिवीगाळ केला. त्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here