‘लाडकी बहीण योजने’बाबत सर्वेक्षणातून ही माहिती आली समोर

0

मुंबई,दि.1: महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पात्र महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळणार आहेत. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीत या योजनेचा महायुतीला फायदा होईल असे अनेकांना वाटते. राज्यात महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मते मिळविण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. त्यामध्ये लाडकी बहीण ही प्रमुख योजना आहे.

या योजनेबाबात राज्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी एक सर्वेक्षण केले, आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निकालांनंतर लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. सरकारकडून 80 लाख बहिणींच्या खात्यावर 3 हजार रुपये जमाही झाले. मात्र 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी बहिणी अजून बाकी आहेत.

लाडकी बहीण योजनेचा राज्यात किती परिणाम होतोय? याबाबत राज्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी 16 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान राज्यात व्यापक सर्वेक्षण केले आहे. त्यात त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’चा महायुतीला फायदा होणार का?, असा प्रश्न केला होता. त्यावर आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत.

या सर्व्हेत सहभाही लोकांपैकी 40 टक्के लोकांना वाटते की, या योजनेचा फायदा होईल तर 37 टक्के लोकांनी या योजनेचा फायदा होणार नसल्याचे ठाम सांगितले. 23 टक्के लोकांना माहित नसल्याचे सांगितले. लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारने गाजावाजा केला. त्याबाबत मोठा कार्यक्रमही केला. पण दयानंद नेने यांच्या म्हणण्यानुसार लाडकी बहिण योजनेची महायुतीच्या बाजूने कोणतीही लाट निर्माण झालेली नाही. ते म्हणाले, हा निवडणूक स्टंट असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली असून, सरकार फुकटात पैसे वाटप करत असेल तर सोडा का? अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. तर दयानंद नेने म्हणाले की, या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांना वाटते. अनेक संपन्न कुटुंबातील महिलांना पैसे कसे मिळाले? राज्य सरकारने याची चौकशी करणे गरजेचे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here