सोलापूर,दि.३: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात निर्बंध लागू करण्यात आले होते. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी तसे आदेश काढले होते. आज (दि.३) आयुक्त पी शिवशंकर यांनी आदेश काढत निर्बंधात अंशतः सूट दिली आहे.
कोरोना विषाणू ( कोव्हीड -१९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८ ९ ७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून, महानगरपालिका आयुक्त हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
ओमिक्रॉन कोविड १९ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या विषाणुचा प्रसाराचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता असल्याने शासनाकडील संदर्भ क्र. ७ अन्वये कोविड -१९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध ( प्रतिबंध ) करण्यासाठी साथ रोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध जारी करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. तथापि लसीकरण झालेल्या प्रभावी कामकाजाच्या अनुषंगाने सदर निर्बंधामध्ये शासनाकडील दिनांक ३१/०१/२०२२ च्या आदेशान्वये अंशत : सुट देण्यात आलेली आहे.
त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९ ७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिका कोरोना ( कोविड -१ ९ ) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरुन सोलापूर शहर हद्दीत दि. ०३/०२/२०२२ रोजी रात्री ००.०० पासून खालीलप्रमाणे निर्बंध लागू राहतील.
१. ऑनलाईन तिकीटाची सुविधा उपलब्ध असलेले सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार खुली राहतील. तथापि सर्व अभ्यागतांचे लसीकरण ( दोन मात्रा ) पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. तसेच कोविड -१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सदर ठिकाणावरील संबधीत नियंत्रण अधिकारी यांनी अशा ठिकाणी एका वेळेस भेट देणाऱ्या अभ्यांगतांची संख्यावर नियंत्रण ठेवणेकामी योग्य ते निर्बंध ठेवण्यात यावे.
२. ऑनलाईन तिकीटाची सुविधा उपलब्ध असलेले सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेनुसार खुली राहतील. तथापि सर्व अभ्यागतांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील. तसेच कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सदर ठिकाणावरील संबधीत नियंत्रण अधिकारी यांनी अशा ठिकाणी एका वेळेस भेट देणाऱ्या अभ्यांगतांची संख्यावर नियंत्रण ठेवणेकामी योग्य ते निर्बंध ठेवण्यात यावे.
३. ब्युटी पार्लर व केश कर्तनालय यांना लागू केलेल्या निर्बंधाप्रमाणे स्पा सेंटर ५० % क्षमतेसह चालू राहतील.
४. अंत्यसंस्कार / अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवरील निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. वरील शिथिल केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त इतर मुद्यांबाबत यापूर्वी या कार्यालयाचे दिनांक ०९ / ०१ / २०२२ च्या आदेशान्वये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती , संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी / विभागीय अधिकारी व अधिनस्त कर्मचारी यांनी कारवाई करावी असे आयुक्त पी शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
Home सोलापूर वार्ता Solapur: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरिता आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले आदेश







