Solapur Accident: एसटी बस आणि ट्रकचा सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात 

0

सोलापूर,दि.३: एसटी बस आणि ट्रकचा सोलापूर हैदराबाद (Solapur Hyderabad Highway Accidentमहामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बोरामणी जवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात बसच्या एका बाजूचा चेंदामेंदा झाला. अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

एसटी बस बिदरहून पंढरपूरकडे येत होती. बसला ट्रकने जोरदार धडक दिली, त्यामध्ये बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली आहे.

अपघात एवढा भीषण होता की, बसचा एक भाग पूर्णपणे उघडा पडला आहे. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here