सोलापूर,दि.3: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांची संख्येत घट होताना दिसत आहे. सोलापूर शहरातील चाचण्यांच्या प्रमाणात नवीन रुग्णांच्या संख्येत कधी वाढ तर कधी घट दिसून येत आहे तर जिल्हा ग्रामीण चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 1854 अहवाल प्राप्त झाले, यात 1599 निगेटिव्ह तर 255 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 145 पुरुष व 110 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1695 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 575 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 184477 झाली आहे. तर यापैकी 179079 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3703 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2408 पुरुष व 1295 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर 1104 अहवाल प्राप्त झाले. यात 1056 निगेटिव्ह तर 48 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 25 पुरुष व 23 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1933 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 123 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33131 झाली आहे. तर यापैकी 29702 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1496 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 954 पुरुष व 542 महिलांचा समावेश आहे.




