मुंबई,दि.4: Shalini Patil On Ajit Pawar: अजित पवारांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे असे माजी आमदार शालिनी पाटील (Shalini Patil) यांनी म्हटले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीचा निर्णय खूप घाईत घेतला, असं मत माजी आमदार शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही आपला कामकाज संभाळते त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं त्या म्हणाल्या आहेत.
तसंच अजित पवार (Ajit Pawar) घोटाळेबाज आणि गुन्ह्यांखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, अशी घणाघाती टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे. तर अजित पवारांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणूनच ईडीकडून अद्याप एकदाही अजितदादांची चौकशी झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या पाठीशी भाजपा नेत्याचा हात | Shalini Patil On Ajit Pawar
शरद पवार यांनी निवृत्ती घेतली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष ठरवायचा असेल तर सुप्रिया सुळेंकडेच ते पद जावं. कारण सुप्रिया या पदासाठी सक्षम आहे. अजित पवार हे गुन्ह्यांखाली अडकलेले घोटाळेबाज नेते आहेत. त्यांना राष्ट्रवादीचं अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल असंही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे. शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या की, आमदार हसन मुश्रीफ यांना 100 कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलावते मग अजित पवारांना 1400 कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात चौकशीसाठी का बोलवत नाही? अजित पवारांच्या पाठिशी भाजपाचा बडा नेता आहे. त्यामुळे अजित पवारांना व्यवस्थित सावली मिळाली आहे. कुठल्याही चौकशीहीसाठी त्यांना बोलावलं जात नाही. मात्र अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते एवढे गुन्हे आणि आरोप त्यांच्यावर आहेत.
शरद पवारांनी लवकर निवृत्ती जाहीर केली | Shalini Patil
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्यावरही शालिनीताई पाटील यांनी भाष्य केलं. शालिनीताई म्हणाल्या की शरद पवार यांनी असा निर्णय घेताना घाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली असली तरीही जोपर्यंत समिती निर्णय घेत नाही तोपर्यंत हा निर्णय मान्य होणार नाही. माझं वय 90 वर्षे आहे मी अजूनही कामकाज सांभाळते. शरद पवार माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांनी निवृत्त व्हायला घाई केली आहे असं शालिनी पाटील यांनी म्हटलं आहे.