Sambhaji Raje: संभाजीराजे छत्रपती यांनी मराठी चित्रपट निर्मात्यांना दिला इशारा

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मराठी चित्रपट निर्मात्यांना (Marathi Filmmakers) इशारा दिला आहे.

0

मुंबई,दि.६: संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मराठी चित्रपट निर्मात्यांना इशारा दिला आहे. अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर आधारित अनेक मराठी चित्रपट (Marathi Movie) निर्माण करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मराठीत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक ऐतिहासिक चित्रपट आले आहेत.

या चित्रपटांमध्ये अनेकदा इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच मुद्द्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आज पत्रकार परिषद घेऊन चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना चांगलाच दम दिला.

चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे

यावेळी संभाजीराजे महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आणि सुबोध भावे अभिनीत ‘हर हर महादेव’ चित्रपटावर चांगलेच संतापले. ‘हे काय मावळे आहेत, यांच्या डोक्यावर पगडतरी आहे का? पगडी काढणे म्हणजे शोक संदेश असतो. हे असे मावळे असतात का? ड्रामेटायझेशन दाखवण्याच्या नावाखाली काहीही करणार का? असे चित्रपट काढणार असाल तर सरकारने सेंसॉरवर ऐतिहासिक समिती स्थापन करावी. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे,’ असा इशारा संभाजीराजेंनी यावेळी दिला.

मराठा म्हणजे सर्व मराठी माणसं

संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, ‘आपण सर्वजण मराठे आहोत. त्या काळात मराठा जात नव्हती. मराठा म्हणजे सर्व मराठी माणसं. चित्रपटात काहीही दाखवले जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे, महाराजांचा इतिहास वाचावा. माझा छत्रपतींच्या घराण्यात जन्म झाला आहे, ही माझी जबाबदारी आहे. छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड केली, तर खपवून घेणार नाही. मी तो हर हर महादेव चित्रपट पाहिला नाही. पण, माझ्याकडे रिपोर्ट आली, त्यात इतिहासाची मोडतोड केली आहे. अशाप्रकारचे चित्रपट पुन्हा समोर आले, तर मी त्यांना आडवा जाणार. 

तर शाबसकी देईन
संभाजीराजे पुढे म्हणतात की, ‘मी कोणालाही धमकी देत नाहीये. मी यापूर्वी कोणाला बोललो नाही, पण आता बोललोय. या घराण्यात माझा जन्म झाला, त्यामुळे यापुढे असे चित्रपट काढू देणार नाही. लोकांना विनंती आहे की, त्यांनी असे चित्रपट पाहू नये. मी सेंसॉर बोर्डालाही पत्र देणार आहे. इतिहासाची मोडतोड होत असताना, सेंसॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी, हे मी विचारणार आहे. चांगला चित्रपट काढला, तर मी स्वतः त्यांना शाबासकी देईल,’ असेही ते म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here