ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची हकालपट्टी

0

मुंबई,दि.8: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे (Ratnakar Shinde) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. केज तालुक्यातील उमरी शिवारात कलाकेंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील आरोपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे (Ratnakar Shinde) यांना जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रक शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची हकालपट्टी

काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना मारहाण केल्याचा दावा करणारे अप्पासाहेब जाधव यांचा निलंबन झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनीच रत्नाकर शिंदे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड केली होती. मात्र अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बीडच्या केज पोलिस ठाणे हद्दीत चालणाऱ्या एका कलाकेंद्रावर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा मारला. यावेळी वेगवेगळ्या चार खोल्यांमध्ये काही अल्पवयीन मुली, महिला या पुरुषांसमोर नृत्य करताना पोलिसांना मिळून आल्या होत्या. तर यातील एका अल्पवयीन मुलीने तिला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास लावत असल्याचे सांगितले. सोबतच या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी देखील भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली. तसेच 16 पुरुषांनाही ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा कलाकेंद्र ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे चालवत होता. त्यामुळे शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here