कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत लिंगफोडे, पवार प्रथम

0

सोलापूर,दि.१: कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील सौ. गोपीबाई रामकिसन ( पापाशेठ ) बलदवा हायस्कूल येथे आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत सोनाली लिंगफोडे व करीना पवार या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला.

प्रशालेतर्फे कर्मवीर जयंतीनिमित्त इयत्ता पाचवी ते सातवी या लहान गटासाठी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत १७ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. गणिती प्रतिकृती व वैज्ञानिक रांगोळ्या हा या गटासाठीचा रांगोळी स्पर्धेचा विषय होता. यामधून सोनाली लिंगफोडे, मधुरा पाटील, संस्कृती डोके या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. आठवी ते दहावी या मोठ्या गटात २३ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या गटासाठी वैज्ञानिक रांगोळ्या, मुली वाचवा मुलींना शिकवा, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा आदी विषय देण्यात आले होते. यामधून करीना पवार, संस्कृती अंकुश, सलोनी उबाळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थिनींना प्रा.तुकाराम मस्के, उद्योजक नंदकुमार बलदवा, रामचंद्र जाधव, सोमराज गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रशालेत यानिमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कात्रण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या स्पर्धा देखील घेण्यात आल्या.

या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मारुती मडवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राखी राठोड, स्मृती चवरे, शीला हावळे, यल्लाप्पा माळी, ज्योतीराम परबत, दत्ता पारडे, शिवाजी कुचेकर, किशोर मोरे, किशोर मार्तंडे, वसंत पवार या शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here