Raj Thackeray: महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट, ‘जे मी जगात पाहिलंय ते मी महाराष्ट्रात…’

0

मुंबई,दि.1: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) ट्विटरवर खास पोस्ट केली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांना कसा महाराष्ट्र अपेक्षित आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला सांगितले आहे.

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा | Raj Thackeray On Maharashtra Day

राज ठाकरे यांनी आज सकाळीच महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता सोशल मीडियावर व्हिडीओसहित पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, “जे मी जगात पाहिलंय ते मी महाराष्ट्रात आणू इच्छितो. अख्ख्या जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हेच फक्त माझं स्वप्न आहे.”

या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंचा आवाज ऐकू येत असून “आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा” असा संदेशही या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here