Rahul Gandhi Coolie Number One: काँग्रेस नेते राहुल गांधी झाले ‘कूली नंबर वन’!

0

नवी दिल्ली,दि.२१: Rahul Gandhi Coolie Number One: काँग्रेस नेते राहुल गांधी ‘कूली नंबर वन’ झाले. काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान ते देशभरातल्या असंख्य लोकांना भेटले. अलिकडेच त्यांनी अवजड वाहनचालकांबरोबर, भाजी विक्रेत्यांबरोबर एक दिवस घालवला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, राहुल गांधी यांनी गुरुवारी (२१ सप्टेंबर) दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर जाऊन तिथल्या हमालांशी बातचीत केली. यावेळी राहुल गांधी यांनी हमालांचा लाल रंगाचा शर्ट परिधान करून एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेतली.

काँग्रेस नेते राहुल गांधी झाले ‘कूली नंबर वन’! | Rahul Gandhi Coolie Number One

राहुल गांधी यांनी हमालांचा लाल शर्ट परिधान केला, हमालांचा अधिकृत नंबर असलेला बिल्ला (बॅच) दंडावर बांधला. तसेच एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेऊन काही अंतर चालले. तसेच या हमालांबरोबर त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. देशातल्या सध्याच्या स्थितीवर या हमालांचं मत जाणून घेतलं.

राहुल गांधी यांनी हमालांबरोबर घालवलेले काही क्षण त्यांनी इन्स्टाग्रमावर शेअर केले आहेत. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही राहुल गांधी यांचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. राहुल गांधी यांनी हमालांबरोबरचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की “मलाही या सगळ्यांना भेटण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती आणि त्यांनी मला खूप आपुलकीने बोलावलं होतं. भारतातल्या कष्टकरी बांधवांची इच्छा कोणत्याही किंमतीत पूर्ण व्हायलाच हवी.”

दरम्यान, यूथ काँग्रेसनेही राहुल गांधी यांचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की अख्ख्या जगाचं ओझं आपल्या डोक्यावरून वाहणाऱ्यांच्या मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी राहुल गांधी आज आनंद विहार स्टेशनवर गेले होते.

यावेळी राहुल गांधी यांनी हमालांची ओळख असलेला लाल रंगाचा शर्ट परिधान केला होता. तसेच एका प्रवाशाची बॅगही त्यांनी डोक्यावर घेतली. राहुल गांधी बराच वेळ हमालांबरोबर रेल्वेस्टेशनबाहेर रस्त्याच्या कडेला बसले होते. तसेच तिथं असलेले हमाल आणि इतर प्रवाशांनीही राहुल गांधी यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

दरम्यान, एका हमालाने त्याचा बिल्ला (हमालाचा अधिकृत बॅच) राहुल गांधी यांच्या दंडावर बांधला. राहुल गांधी हे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सामान्य लोकांना भेटत आहेत. त्यांच्याबरोबर वेळ घालवत आहेत. ते कधी भाजी विकेत्यांबरोबर दिसतात, कधी शेतकरी तर कधी छोट्या व्यापाऱ्यांची भेट घेतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here