Pune-Mumbai highway accident: खासगी बसच्या भीषण अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू

0

मुंबई,दि.15: Pune-Mumbai highway accident: खासगी बसच्या भीषण अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Accident News)

हेही वाचा Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल या दिवशी लागणार

चालकाचा ताबा सुटल्याने अपघात | Pune-Mumbai highway accident

पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप 15 ते 20 प्रवासी दरीत अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामधील सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळली | Accident News

सध्या मदतकार्य सुरु असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्संना देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. खासगी बसमध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना ही घटना घडली आहे. ही बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

24 जखमींची नावे

1) नम्रता रघुनाथ गावणूक, वय 29

2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 गोरेगाव.

3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 गोरेगाव.

4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 गोरेगाव.

5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 गोरेगाव.

6) लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय 16 गोरेगाव.

7) आशिष विजय गुरव, वय 19, दहिसर.

8) सनी ओमप्रकाश राघव, वय 21- खालची खोपोली.

9) यश अनंत सकपाळ, वय 19- गोरेगाव.

10) वृषभ रवींद्र थोरवे, वय 14-गोरेगाव.

11) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव.

12) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 कांदिवली.

13) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 कांदिवली.

14) रुचिका सुनील धूमणे, वय 17 गोरेगाव.

15) ओम मनीष कदम, वय 18 गोरेगाव.
16) युसूफ उनेर खान, वय 14 गोरेगाव.

17) अभिजित दत्तात्रय जोशी, वय 20 रत्नागिरी,

18) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 मुंबई.

19) हर्ष वीरेंद्र दुरी, वय 20 कांदिवली.

20) ओमकार जितेंद्र पवार, वय 24 खोपोली, सोमजाई वाडी

21) दिपक विश्वकर्मा, वय 21 कांदिवली.

22) हर्षदा परदेशी

23) वीर मांडवकर

24) मोहक दिलीप सालप, वय 18 मुंबई.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here