Priyanka Chaturvedi On Central Government: ‘शिंदे-फडणवीस यांचे सरकार अधिकृत ठरविणाराही…’ खासदार प्रियंका चतुर्वेदी

0

नवी दिल्ली,दि.२०: Priyanka Chaturvedi On Central Government: दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकार काढून घेणारा अध्यादेश केंद्र सरकारने आणल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शिंदे-फडणवीस यांचे सरकार अधिकृत ठरविणाराही अध्यादेश काढणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी (११ मे) दिल्ली सरकारच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र शुक्रवारी (१९ मे) केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला एक प्रकारे बगल दिली आहे.

शिंदे-फडणवीस यांचे सरकार अधिकृत ठरविणाराही अध्यादेश | Priyanka Chaturvedi On Central Government

नव्या अध्यादेशाद्वारे ‘राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण’ची स्थापना झाली आहे. ज्या माध्यमातून गट अ अधिकाऱ्यांची नियुक्ती व बदली यापुढे केली जाईल. दिल्लीचे प्रशासकीय अधिकार मिळवण्यावरून सुरू झालेला हा वाद आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यातच ठाकरे गटाच्या नेत्या, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शिंदे-फडणवीस यांचे सरकार अधिकृत ठरविणाराही अध्यादेश काढणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अध्यादेश काढल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि दिल्ली सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणारे विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी यावर कडाडून टीका केली. “आम्ही हा अध्यादेश तपासून पाहू. अध्यादेशामधील मजकूर न वाचताही मी हे सांगू शकतो की, हा अतिशय केविलवाणा प्रयत्न आहे. या अध्यादेशामुळे संविधानातील तत्त्वांची पायमल्ली होत आहे का, हेही तपासून पाहू. तसेच जर संपूर्ण संसदेने एकमताने हा अध्यादेश मंजूर केला, तर तो वेगळा विषय असू शकतो,” अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सिंघवी पुढे म्हणाले, “ज्या व्यक्तीने हा अध्यादेश तयार केला, त्याने आनंदाच्या भरात कायद्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांपेक्षाही अधिक अधिकार प्रदान केले आहेत. ही बाब या अध्यादेशातून बाजूला काढलेली आहे. संघराज्यवाद ही राज्यव्यवस्थेची मूलभूत रचना आहे. प्रशासकीय अधिकारी हे राजकीय कार्यकारी मंडळाला उत्तरदायी आहेत. मात्र अध्यादेशामुळे मुख्यमंत्री स्वतःच अल्पमतात जात आहेत.”

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे केंद्र सरकार हलले आहे

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले असून महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे केंद्र सरकार हलले आहे. आता ते आणखी एक अध्यादेश आणून महाराष्ट्रातील अवैध सरकारला कायदेशीर ठरविणार का?”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here