सोलापूर,दि.18: मॅक्स किप्टो कंपनी बंद पडल्याने गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी करून त्रास देऊन किरण मंगलपल्ली यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुलगम टेक्स्टाईलचे मालक 1)नित्यानंद रामय्या पुलगम यांच्यासह कारखानदार 2) निलेश वाघमोडे 3) गिरीश चिप्पा 4) तुषार चिप्पा 5) अमर छुरी 6) श्रीकांत बसाटे 7)0विगेश्वर काँम्पेव्हा 8) पोशेटी येमूल 9) कुष्णा आडम 10)श्रीनिवास मिसालोलू 11) प्रविण चिप्पा 12) अमर मोठे 13) विशाल मिठ्ठा 14) राहुल कुरापाटी 15) विनोद कामुती 16) ऋषी महेश्वरम 17) अमर एक्कलदेवी 18) मोतीलाल गुंनाळ 19) गणेश आडम सर्व रा.सोलापूर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी मंजूर केला.
यात हकिकत अशी की, सन 2022 मध्ये आक्टोबंर महिन्यात मॅक्स क्रिप्टो या कंपनीमधे लोकांची फसवणूक झाली म्हणून पेपरमध्ये बातमी आली होती. त्यामधे न्यू पच्छा पेठ येथील मॅक्स क्रिप्टो कंपनीबद्दल माहिती आली व किरण हे गुंतवणूक दाराचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत अशी बातमी आली. दि. 1/12/2022 रोजी फिर्यादीचे पति घरातून नेहमीप्रमाणे कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेले. 2/12/2022 रोजी फिर्यादीचे घरी फिर्यादी व तिचे सासरे घरी असताना गिरीश चिप्पा, तुषार चिप्पा, अन्वर छुरि, निलेश वाघमोडे व राहुल कुरापाटी असे सर्वजण एकत्र येऊन फिर्यादीचे पती कुठे आहेत, त्यांचा मोबाईल लागत नाही असे विचारले व त्यांनी फिर्यादीस किरण यास बोलावून घ्या, आपण सेटलमेंट करू असे सांगितले व निघुन गेले.
तद्नंतर फिर्यादीच्या पतीने सांगली येथील लॉजमध्ये नित्यानंद पुलगम, निलेश वाघमोडे, गिरीश चिप्पा, तुषार चिप्पा, अनवर छुरी, श्रीकांत बसाटे, विग्नेश्वर काँपेव्हा, पोशेट्टी येमुल, कुष्णा आडम, श्रीनिवास मिसालोलू,प्रविण चिप्पा, अमर मोठे, विशाल मिठ्ठा, राहुल कुरापाटी, विनोद कामुनी,ऋषी महेश्वरम, अमर एक्कलदेवी, मोतीलाल गुंनाळ व गणेश आडम यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद जेलरोड पोलीस स्टेशन येथे मयताच्या पत्नीने दाखल केली होती. सदर गुन्हयामध्ये अटक होईल ह्या भितीपोटी आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
यात सरकारतर्फे युक्तिवाद करताना ॲड. प्रदीप रजपूत यांनी हि घटना खुनाची असण्याची शक्यता सांगून तपास अधिकाऱ्याच्या विपरीत भूमिका घेतली परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
पुलगम टेक्स्टाईलच्या मालकासह 19 कारखानदारांना अटकपूर्व जामीन मंजूर
यात आरोपीतफे युक्तिवाद करताना ॲड. संतोष न्हावकर, ॲड.जयदीप माने व ॲड. प्रशांत नवगिरे यांनी रक्कम वसूलीसाठी प्रयत्न करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे असे म्हणता येणार नाही व उशिरा दाखल केलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवता येणार नाही असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले व त्याप्रुष्ठर्थ मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात आरोपीतफेँ ॲड. संतोष न्हावकर, ॲड.जयदीप माने, ॲड.प्रशांत नवगिरे, ॲड. इस्माईल शेख, ॲड.हेमंत साका, ॲड.राहुल रुपनर, ॲड. आर.ए.शेख, ॲड.पी. वी. यादव, ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. शैलेश पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदिप रजपूत यांनी काम पाहिले.