शरद पवार यांनी मानले उद्योगपती गौतम अदानींचे जाहीर आभार

0

बारामती,दि.23: खासदार शरद (Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचे जाहीर आभार मानले आहेत. बारामतीतील नव्या टेक्नॉलॉजी सेंटरच्या निर्मितीसाठी 25 कोटींची गरज होती, त्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी मदत केल्याचं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारयांनी त्यांचे आभार मानले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबेटिक लॅबचे उद्घाटन शरद पवार आणि फिनॉलेक्स कंपनीचे दीपक छाबरिया यांच्या हस्ते झालं. त्यावेळी शरद पवारांनी अदानींचे आभार मानले.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्ताने बोलताना शरद पवार म्हणाले की, आपण संस्थेच्या मार्फत जगातलं पहिलं नव टेक्नॉलॉजी सेंटर बनवत आहोत. याला 25 कोटी रुपये लागणार होते. त्यासाठी 25 कोटी रुपयांचा धनादेश गौतम आदानी यांनी दिला आहे. त्यांचं नाव या ठिकाणी मला घेतलं पाहिजे.

अदानींचे नेहमी कौतुक

एकीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि इतर काही पक्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडे त्याच आघाडीचे घटक असलेल्या शरद पवारांनी मात्र आपली भूमिका कायम ठेऊन अदानींची पाठराखण केली आहे. देशातील उद्योग विकासामध्ये गौतम अदानींचं मोठं योगदान असून असल्याचं शरद पवारांनी या आधीही सांगितलंय. तसेच गौतम अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून चौकशी करा या राहुल गांधीच्या मागणीलाही त्यांनी विरोध केला होता.

आपल्या भागात उसाची शेती जास्त आहे. उसाची साखर बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे ते जगात झपाटयाने बदलत आहे. असे तंत्रज्ञान इथं आणता येईल का याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जगात जे नवं आहे ते सगळं आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, इंजिनिअरिंग क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा वापर झपाट्याने वाढत आहे. आपण देखील नवा बदल स्वीकारला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करणाऱ्या लोकांची देशाला आणि जगाला गरज निर्माण झाली आहे. आज आपण बारामतीत जे बनवत आहोत त्याचा उपयोग सगळ्या विद्यार्थ्यांना होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here